इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे प्रांतधिकारी तेजस चव्हाण यांची बदली ; रवींद्र ठाकरे उपविभागीय अधिकारी म्हणून स्वीकारणार कार्यभार

इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ – इगतपुरी त्र्यंबकेश्वर उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी शिर्डी येथे प्रांताधिकारी म्हणून काम केलेले रवींद्र ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र महाराष्ट्र शासनाचे सहसचिव डॉ. माधव वीर यांनी निर्गमित केले आहे. तेजस चव्हाण यांनी इगतपुरी त्र्यंबकेश्वर उपविभागात अतिशय उत्तम काम केले आहे. त्यांच्या बदलीचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित केले जाणार आहेत. रवींद्र ठाकरे यांची बदली नंदुरबार येथे महसूल प्रशासन उपजिल्हाधिकारी म्हणून झाली होती. मात्र शासनाने त्यामध्ये बदल करून त्यांना इगतपुरी त्र्यंबकेश्वर उपविभागीय अधिकारी म्हणून स्वतंत्र आदेशाने नियुक्ती दिली आहे.

error: Content is protected !!