
किरण रायकर : इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ – कावनई येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडून मानव मिशन अंतर्गत आठवीच्या एकूण ३५ विद्यार्थिंनींना सायकली वाटप करण्यात आल्या. ग्रामीण विद्यार्थिंनींना दुसऱ्या गावातील शाळेत जाण्यासाठी पायपीट करत जावे लागत होते. मानव विकास मिशनअंतर्गत आठवीच्या मुलींना सायकल वाटप करण्यात आल्याने मुलींनी आनंद व्यक्त केला. कार्यक्रमावेळी कावनईच्या सरपंच सुनीता पाटील, गोपाळ पाटील, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अशोक पाटील, प्रकाश पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजू शेख, रवी पाडेकर, तुकाराम झेंडे, उतम येडे, दिगंबर पाटील, संदीप शिरसाठ, माजी विद्यार्थी विकास शिरसाठ, वैभव पाटील, मुख्याध्यापक बाळासाहेब गांगुर्डे, एम. एस. पाटील, आर. पी. पाटील, बी. एस. निकम, एस. डी. हिरे आदी उपस्थित होते.