आगरी महोत्सवाचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज होणार उदघाटन : घोटी येथे आजपासून ५ दिवस होणार आगरी महोत्सव ; लाभ घेण्याचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या हस्ते आज सायंकाळी घोटी येथील आगरी महोत्सवाचे उदघाटन होणार आहे. यावेळी इगतपुरी तालुक्यातील विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. इगतपुरी तालुक्यात मोठ्या संख्येने असणाऱ्या आगरी समाजाच्या वतीने भव्य स्वरूपात ह्या पाच दिवसीय आगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यात पहिल्यांदाच होत असलेला हा कार्यक्रम आजपासून १२ फेब्रुवारी पर्यंत घोटी येथे होणार आहे. ह्या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आगरी महोत्सवाच्या आयोजकांनी केले आहे.

आगरी समाज हा मोठ्या संख्येने इगतपुरी तालुक्यात आहे. येथील भूमिपुत्र असल्याने या समाजाने तालुक्याच्या विकासात मोठी भूमिका बजावली आहे. आगरी महोत्सवाचा प्रारंभ आज ८ फेब्रुवारीला होत असून समारोप  १२ फेब्रुवारीला होईल. घोटी येथील टोलनाका भागात या आगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध कार्यक्रमांची मेजवानी आणि मनोरंजन सर्वांना अनुभवता येणार आहे. इगतपुरी तालुक्यातील तमाम नागरिकांनी ह्या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त आगरी समाज बांधवांनी केले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!