
इगतपुरीनामा न्यूज, दि. २८ – धामडकीवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. शाळेतील सर्व माता व ग्रामस्थ या मेळाव्यास उपस्थित होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याला प्रारंभ झाला. राज्य आदर्श शिक्षक तथा मुख्याध्यापक प्रमोद परदेशी यांनी निपुण भारत अंतर्गत विद्यार्थी अध्ययन स्तर प्रगती बाबतची माहिती मातांना दिली. विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्य विषयावर सर्व मातांना मार्गदर्शन केले. आशा वर्कर धोंडीबाई आगिवले, ग्रामपंचायत सदस्य चांगुणा आगिवले यांच्या सहकार्याने महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. सर्व उपस्थित महिला, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचा संगीत खुर्ची खेळ घेण्यात आला. अभिनव अजमेरा, पेहेचान प्रगती फाउंडेशन यांच्या सौजन्याने शाळेतील विद्यार्थी व सर्व माता व ग्रामस्थांना भरपेट पाणी पुरी खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक दत्तू निसरड, गोकुळ आगिवले, बबन आगिवले, खेमचंद आगिवले, लहानू आगिवले, लक्ष्मण आगिवले, नवनाथ आगिवले, खेमा आगिवले आणि ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.
