इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ – इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द येथे ३० नोव्हेंबर २०१९ ला रात्री दीडच्या सुमारास बाप आणि लेकाचा खून झाल्याची खळबळजनक घटना घडली होती. काशीराम वामन फोकणे वय 65, ज्ञानेश्वर काशीराम फोकणे वय 48 असे निर्घृण खून झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. हा खून त्यांची मुले राहुल ज्ञानेश्वर फोकणे वय २५, प्रमोद ज्ञानेश्वर फोकणे वय २३, नितीन ज्ञानेश्वर फोकणे वय २० यांनी केला असल्याचे स्थानिक गुन्हा शाखेने उघडकीस आणले होते. ज्ञानेश्वर फोकणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी होते. ह्याप्रकरणी न्यायालयाने राहुल व नितीन यांना वडील आणि आजोबा यांचा खून केला म्हणून जन्मठेपेची शिक्षा आज सुनावली. नितीन ह्याला निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलीस पाटील कैलास बहिरु फोकणे यांनी फिर्याद दिली होती. वडिलांचे अनैतिक संबंध असल्याने कर्जबाजारी असल्याने जमीन आणि हॉटेल विक्री केली जाणार होती. यासाठी आजोबा यांचा पाठिंबा असल्याने दोघांचा खून करण्यात आल्याचे सिद्ध झाले. त्यानुसार दोन्ही सक्ख्या भावांना जन्मठेप शिक्षा सुनावण्यात आली आहे. वाडीवऱ्हे पोलीस आणि स्थानिक गुन्हा शाखेच्या योग्य तपासामुळे हा गुन्हा सिद्ध झाला आहे. इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द ह्या अत्यंत छोट्या गावी ज्ञानेश्वर काशीराम फोकणे वय 48 हे पत्नी आणि 3 मुलगे यांच्यासह राहत होते. मळ्यात त्यांची शेती असून वडील काशीराम वामन फोकणे हे एकटे मळ्यात राहायचे. ज्ञानेश्वर फोकणे यांनी एसएमबीटी परिसरात हॉटेल व्यवसाय सुरू केला असून त्यांचा संपूर्ण परिवार तेथेच वास्तव्यास आहे. ज्ञानेश्वर फोकणे वडिलांना जेवणाचा डबा घेऊन आले होते. मात्र रात्री दीडच्या सुमारास त्यांच्यावर हल्ला करून खून केला होता. यावेळी काशीराम वामन फोकणे वय 65 यांचाही निर्घृण खून झाला होता.