राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे ‘जिंदाल’ दुर्घटनेत मदत कार्य करणाऱ्यांसाठी जेवणासह बहुमोल सहकार्य

इगतपुरीनामा न्यूज, दि. १ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इगतपुरी तालुक्याच्या वतीने मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीत जवळपास २ हजार ५०० कामगार आणि अन्य नागरिकांना भोजन व्यवस्था करण्यात आली. संबंधित कामगारांचे कुटुंब, मदत कार्य करणारे पोलीस प्रशासन, अग्निशमन कर्मचारी यांना चहा, पाणी आणि रात्रीच्या जेवणाची रास्व संघाने व्यवस्था केली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वयंसेवक जिल्हा सहकार्यवाह नामदेव शेलार, तालुका कार्यवाह संदीप बकरे, योगेश सूर्यवंशी, बाळासाहेब सुराणा, वैभव कुमठ, सुरेश दुर्गुडे, शशांक सोनवणे, किरण फलटणकर, गोरख वालझाडे, सुरेश काजळे, भाऊसाहेब कडभाने, तानाजी जाधव, हरिभाऊ गुळवे, मंगेश गोसावी, बबन जाधव, जनार्दन शिंदे, मुकेश गौड, अर्जुन कर्पे, मयूर परदेशी, आकाश पारख, शैलेश शर्मा, गोकुळ करवर, श्रीकांत काळे, विपुल करंजकर, जयप्रकाश नागरे आदींनी मदतकार्य करण्यात महत्वाचे योगदान दिले. ह्या कार्याबद्धल सर्वांचे प्रशासनातर्फे कौतुक करण्यात आले आहे. यापुढेही मदतकार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करणार असल्याचे सांगण्यात आले.

Similar Posts

error: Content is protected !!