
इगतपुरीनामा न्यूज, दि. १ – जिंदाल कारखान्यात झालेली आग शमलेली नसतांना इगतपुरी तालुक्यातील तळोशी येथे आज रात्री साडेनऊ वाजता गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. सुदैवाने ह्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दत्तू पांडुरंग गुंजाळ यांचे पाच खण जुने घर संपूर्ण नेस्तनाबूत झाले आहे. ह्या घरात भगवान पांडुरंग गुंजाळ हे आपल्या पत्नीसह राहत होते. आज अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने तळोशी परिसर हादरला आहे. जीवितहानी नसल्याने नागरिकांनी समाधान मानले