‘जिंदाल’ आगीच्या दुर्घटनेतील मृतांना प्रत्येकी ५ लाखांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

इगतपुरीनामा न्यूज, दि. १ – इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव शिवारात असलेल्या जिंदाल कंपनीत आज रविवार रोजी पहाटेच्यासुमारास झालेल्या स्फोटानंतर आग लागली. या आगीत दोन कामगारांचा मृत्यू झाला असून अन्य १७ कामगार जखमी झाले आहेत. या घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत राज्य शासनाकडून दिली जाणार आहे, तर जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

जिंदाल कंपनीत लागलेल्या आगीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येवून भेट देत पाहणी केली. त्यानंतर  त्यांनी दवाखान्यात जाऊन जखमी कामगारांची विचार पूस केली. यावेळी बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री  दादाजी भुसे हे देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जिंदाल कंपनीत लागलेली आग भयंकर होती. आगीचे मुख्य कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र याबाबत उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. या आगीत १९ कर्मचारी जखमी झाले असून यापैकी दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये राज्य शासनाकडून मदत देण्यात येणार आहे. तसेच जखमींवर राज्य शासनामार्फत मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Similar Posts

error: Content is protected !!