इगतपुरीनामा न्यूज, दि. १ – महाराष्ट्रातील सर्वात मोठी आगीची घटना असणाऱ्या मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीतील भयानक आग शमवण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न सुरु आहे. बचावकार्य करण्यासाठी यंत्रणेने प्रभावी काम सुरु केलेले आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम यांच्याकडील मोफत रुग्णवाहिका अविरत २४ तास गोंदे फाट्यावर उपलब्ध असते. ह्या रुग्णवाहिकेला मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीतील भीषण आगीची घटना समजताच सर्वप्रथम मदतकार्य करण्यासाठी ही रुग्णवाहीका घटनास्थळी दाखल झाली रुग्वाहीकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी स्वतः अनेक जखमींना आगीतून बाहेर काढले. सर्व जखमींना समयसुचकतेने नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांनी आतापर्यंत किमान अनेक लोकांना रुग्णालयात दाखल केले. इगतपुरी येथील महिंद्रा कारखान्याचे विशेष सुरक्षा अधिकारी हरीश चौबे यांनीही आपल्या पथकासह जिंदालमध्ये धाव घेऊन युद्धपातळीवर मदतकार्य सुरु केले आहे. हरीश चौबे, निवृत्ती पाटील गुंड यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना बाहेर काढले. दोघांच्या तातडीच्या मदतीने अनेक जणांचा प्राण वाचवायला मोठी मदत झाली आहे. अजूनही बचावकार्य सुरुच आहे.
संबंधित बातमी https://igatpurinama.in/archives/11940