
इगतपुरीनामा न्यूज, दि. १ – इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव औद्योगिक वसाहतीतील सर्वांत मोठा असणाऱ्या जिंदाल पॉलिफिल्म कारखान्यात साडेअकरा वाजेच्या सुमारास मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली आहे. आगीचे रौद्ररूप इतके भयंकर आहे की इगतपुरी तालुक्याच्या विविध भागात आगीचे लोळ दिसत आहेत. या घटनेत मोठ्या संख्येने जीवितहानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेकडो लोक जखमी झाले असल्याचे नागरिक बोलत आहेत. आग विझावण्यासाठी इगतपुरी तालुक्यासह विविध नाशिकच्या भागातून अग्निशमन यंत्रणा सक्रिय काम करीत आहेत. पोलिसांनी तातडीने दखल घेऊन घटनास्थळी धाव घेतली आहे. अनेक रुग्णवाहीका कंपनीत पोहोचल्या आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या प्रकाराने जिल्हाभर हळहळ व्यक्त होत आहेत.आगीमुळे जीवित अथवा वित्तहानी किती प्रमाणात झाली हे अद्याप समजके नसले तरीही काही वेळात आगीचे कारण व एकूण नुकसान याबाबत अद्याप माहिती हाती आलेली नाही. जवळ जवळ 100 फूट उंच आगीच्या ज्वाला,आणि शेकडो फूट उंच हवेत काळा धुरच धूर दिसत आहे.

Comments
Comments are closed.