कवयित्री – कु. सोनाली कोसे, चंद्रपूर
गोड आणि कडू आठवणी
राहतील सदैव स्मरणात
चूक, भूल कळून चुकून
क्षमस्व त्यास जीवनात
विविधरंगी माणसे भेटली
कुणी वाईट तर कुणी चांगले
त्यांच्यातील निरागसता, स्वभाव
चांगल्याने मनी साठवून ठेवले
कुणी काळजाला दुखापत
तर कुणी मन दुखावून गेले
स्वार्थी हेतूने जवळ घेऊन
अर्ध्यावरचा डाव खेळून गेले
किती यातना ह्या जीवाला
जेव्हा कुणी साथ सोडली
अंधाऱ्या कोठडीत कोंडल्यासारखे
डोळे सतत पाणावत राहिली
सरत्या वर्षात खूप काही
शिकण्यासारखे अनुभव आले
जीवनात कुणी कुणाचं नसतं
हेही अनुभवायला मिळाले
सरत्या वर्षाच्या आठवणींचा
बांधुनी एकत्र सुख दुःखाचं गाठोडं
नवी स्वप्न, नवी आशा, नववर्ष
हर्ष उल्हासात स्वागत करूया थोडं