प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. १२ –
इगतपुरी तालुक्यातील मुख्य भाताचे अवकाळीने मोठे नुकसान झाले असून पीकविमा कंपनीने अद्यापही दखल घेतली नाही. विम्याचा लाभ व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी काँग्रेस इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांनी नाशिकचे पालकमंत्री ना. दादा भुसे यांना केली आहे. काँग्रेस शिष्टमंडळाच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. पालकमंत्री ना. भुसे यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी दिले.
काँग्रेस तालुकाध्यक्ष रमेश जाधव, रामदास बाबा मालुंजकर, कारभारी नाठे, दशरथ मालुंजकर, रावसाहेब मालुंजकर, अनिल मालुंजकर, तानाजी करंजकर, दिलीप मालुंजकर, सुरेश धोंगडे आदींनी यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली. भात पिकाचे अवकाळीने मोठे नुकसान झाले असूनही विमा कंपनीने अद्यापही दखल घेतली नाही. अनेक ठिकाणी भातपिकावर रोगाचा प्रादूर्भाव झाल्यानेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शासनाने आणि विमा कंपनीने दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.