माजी सैनिकांतर्फे हुतात्मा स्मारकामध्ये नौसेना दिवस साजरा

इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ – आज नाशिक येथील हुतात्मा स्मारक येथे जिल्ह्यातील माजी सैनिकांतर्फे नौसेना दिवस साजरा करण्यात आला. आजच्याच दिवशी ४ डिसेंबर १९७१ मध्ये ऑपरेशन ट्राइडेंट’ सुरू झाले. यावेळी भारतीय नौसेनेने पाकिस्तानच्या कराची नौसैनिक अड्ड्यावर हल्ला करून कराची नौसेना तळ उध्वस्त करून भारताला मोठा विजय मिळवून दिला होता. म्हणून ४ डिसेंबर हा नौसेना दिवस म्हणुन साजरा केला जातो. ह्या कार्यक्रमाचे आयोजन माजी सैनिक रवींद्र शार्दूल यांनी केले. नौसेना दिनानिमित्त नौसेनेचे मार्कोस कमांडो हरीश चौबे, मार्कोस कमांडो सुनील सोनवणे, १९७१ च्या युध्दात प्रत्यक्ष सहभागी असलेले माजी सैनिक महाले साहेब यांना सन्मानित करण्यात आले.

नाशिक जिल्ह्यातील माजी सैनिकांचे भीष्म पितामह म्हणुन ओळखले जाणारे माजी सैनिक संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष विजय काका पवार, माजी सैनिक पळशीकर साहेब, माजी सैनिक कांबळे साहेब यांचाही सत्कार करण्यात आला. प्रहार सैनिक कल्याण संघ नाशिक जिल्हाध्यक्ष माजी सैनिक विजय कातोरे यांच्या हस्ते मान्यवरांना शाल गुलाब पुष्प व सन्मानचिन्ह सन्मान करण्यात आला. नौसेना दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. माजी सैनिक रवींद्र शार्दूल यांनी भारतीय सेनेत नौसेनेचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. हरीश चौबे यांनी सर्वांचे आभार मानले.

Similar Posts

error: Content is protected !!