नांदूरवैद्य येथे दीड वर्षांपासून रखडलेल्या पाईपलाईनच्या कामाचे भूमिपूजन : प्रत्यक्षात काम सुरु झाल्याने नागरिकांनी मानले ग्रामपंचायतीचे आभार

इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ – इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत दीड वर्षांपासून रखडलेल्या पाईपलाईन कामाचे भूमिपूजन पार पडले. दीड वर्षापासून नांदूरवैद्य गावात विहीर, पाण्याची टाकी, त्यासाठी लागणारे शेड बांधण्यात आले होते. गावातील जुनी पाईपलाईन जीर्ण झाल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी खूप अडचणी येत होत्या. रखडलेल्या पाईपलाईनच्या कामाचा ग्रामपंचायतीने सतत पाठपुरावा केला. आता काम मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी आभार मानले. गावाची लोकसंख्या ३ हजाराच्या आसपास असून जशी लोकसंख्या वाढली तसे पाणी देखील आवश्यक आहे. यापूर्वीची पाईपलाईन जुनी असल्याने गावाची तहान भागत नसल्याने अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत होता.

रखडलेल्या पाईपलाईच्या कामाला प्रत्यक्षात प्रारंभ झाल्याने नागरिकांनी ग्रामपंचायतीचे आभार मानले. नागरिकांची तहान भागविण्यासाठी घर तिथे नळ हा उपक्रम आम्ही राबवणार असल्याचे सांगण्यात आले. भूमिपूजन कार्यक्रमावेळी सरपंच उषा रोकडे, उपसरपंच ललिता काजळे, सदस्य उज्वला हारदे, पोपट दिवटे, सविता काजळे, नितीन काजळे, कविता मुसळे, विनोद रोकडे, अशोक भारमल, ग्रामसेवक के. आर. शेळवणे, लिपिक मारुती डोळस, कर्मचारी माधव कर्पे, पप्पू मुसळे, सुखदेव दिवटे, पंढरीनाथ मुसळे, वामन काजळे, मोहन करंजकर, अशोक काजळे, प्रभाकर मुसळे, विनायक रोकडे, सुधाकर काजळे, दिलीप मुसळे रवी काजळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!