इगतपुरीनामा न्यूज, दि. 27
सकस आहाराने शरीराचे पोषण तर चुकीच्या आहाराने अनेक रोगांना सामोरे जावे लागते. उत्तम आरोग्यासाठी दररोज संतुलित आहार, वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे गरजेची आहे. जनतेच्या आरोग्याचा विचार करून जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांच्या मोफत महाआरोग्य शिबिरातून गोरगरिबांना लाभ होत असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ व फिजिशियन डॉ. अतुल वडगांवकर यांनी केले. घोटी येथे महाआरोग्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन जिल्हा नियोजन समिती सदस्य आरोग्यसेवक गोरख बोडके, जैन स्थानक, श्रावक संघ घोटी यांच्यातर्फे करण्यात आले होते. यावेळी डॉ. वडगावकर बोलत होते. या शिबिराला इगतपुरी तालुक्यातील शेकडो नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी शेकडो रुग्णांच्या विविध आजारांवरील सर्व प्रकारच्या मोफत तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये ब्लडप्रेशर, ब्लड शुगर, ईसीजी आणि सर्व आरोग्य मेडिकल मोफत तपासणी, महिलांची सर्व प्रकारची आरोग्य तपासणी, सर्वरोग निदान तपासणी करण्यात आली. शिबिरात प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ व फिजिशियन डॉ. अतुल वडगांवकर, स्त्रीरोगतज्ञ व प्रसुतिशास्त्र तज्ञ डॉ. पूजा वडगांवकर यांनी आरोग्याची काळजी घेण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य बिघडत चालले आहे. होणाऱ्या आजारांना रोखण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. तपासणी न केल्याने अनेक विपरीत घटनांना सामोरे जावे लागते. होणारे दुर्दैवी मृत्यू रोखण्यासाठी जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा समजून आरोग्यदूत म्हणून गोरगरीब आदिवासी जनतेचा आरोग्याचा विचार करणारे गोरख बोडके यांनी सुरू केलेल्या आरोग्य शिबिरातून गोरगरीब रुग्णांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळत आहे असे डॉ. वडगावकर म्हणाले. कार्यक्रमावेळी घोटी ग्रामपालिका पदाधिकारी आणि तालुक्यातील मान्यवर हजर होते.