छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांचा स्वराज्य संघटनेने जाळला प्रतिकात्मक पुतळा : संबंधितांवर गुन्हे दाखल करून अटक करण्याची तहसीलदारांकडे केली मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. 25

अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे वंशज महाराष्ट्रातील प्रत्येक माणसांची अस्मिता आहे. त्यांच्याबद्धल सर्वांना सन्मान आणि आदर सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. मात्र त्यांचा अवमान करण्यासाठी अनेकजण पुढे येत आहेत. अशा प्रकारे छत्रपतींचा अवमान करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि करणी सेनेचा अजय सिंह सिंगर या दोघांचा जाहीर निषेध व्यक्त करत आहोत असे प्रतिपादन नाशिक जिल्हा स्वराज्य संघटनेचे निमंत्रक डॉ. रुपेश नाठे यांनी केले. डॉ. नाठे यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी इगतपुरी तहसील कार्यालय परिसरात राजांचा अवमान करणाऱ्या व्यक्तींचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करून अटक करावी आदी मागण्यांचे निवेदन इगतपुरी तहसीलदार यांना देण्यात आले.

यावेळी नाशिक जिल्हा स्वराज्य संघटना निमंत्रक डॉ. रुपेश नाठे, डॉ. महेंद्र शिरसाठ, धामणीचे उपसरपंच नारायण भोसले, सकळ मराठा समाज तालुकाध्यक्ष नारायण जाधव, प्रताप जाधव, सागर वाजे, शुभम जाधव, घनश्याम बऱ्हे, ऋतिक जाधव, गणेश नाठे, गणपत शिरसाठ ,सोहम धांडे, पियुष भोसले, प्रमोद पाटील, सुमित कडवे, दीपक कातळे किरण धोंगडे, बहिरु भोसले, भाऊसाहेब धोंगडे, तानाजी रूमणे, सखाराम गव्हाणे, गणेश सहाणे, राजु भोसले, गोकुळ धोंगडे, गोकुळ राव, योगेश सहाणे, चेतन रेंदे, उमेश शिरोडे, गोपाळ सोनवणे, योगेश सुरडे, कैलास भोर, प्रकाश जाधव, रोहिदास जाधव, ऋषिकेश भोसले, रामकृष्ण काळे, अजय कश्यप, अमोल खातळे, संतोष कदम आकाश कदम, राजु कदम, अविनाश जाधव, गणेश जगताप, स्वराज्य संघटना पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!