![](https://igatpurinama.in/wp-content/uploads/2022/11/wp-1667887900011-683x1024.jpg)
इगतपुरीनामा न्यूज, दि. ८
अनेक व्याप, धावपळीचे जीवनमान, चुकीची आहारशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य बिघडत चालले आहे. असे असूनही संभाव्य आजारांना रोखण्यासाठी कोणीही आपल्या बहुमोल आरोग्याची तपासणी करीत नाही. परिणामी इगतपुरी तालुक्यात अनेकांना अचानक ह्या जगाचा निरोप घेण्याची दुर्दैवी वेळ आल्याचे दिसते. ह्या अघटीत घटना टाळण्यासाठी प्रत्येकाने आपल्या शरीराची तज्ञांकडून योग्य आरोग्य तपासणी करणे अत्यावश्यक आहे. यासाठी जिल्हा नियोजन समिती सदस्य आरोग्यसेवक गोरख बोडके, जैन स्थानक, श्रावक संघ घोटी यांच्या सौजन्याने घोटी येथे महाआरोग्य मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले आहे. रविवारी 27 नोव्हेंबरला घोटी येथील जैन भवन येथे हे शिबीर होणार आहे. सकाळी १० ते सायं. ५ पर्यंत होणाऱ्या ह्या महाआरोग्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा नियोजन समिती सदस्य आरोग्यसेवक गोरख बोडके, जैन स्थानक, श्रावक संघ घोटी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
ब्लडप्रेशर, ब्लड शुगर, ईसीजी आणि सर्व आरोग्य मेडिकल मोफत तपासणी, महिलांची सर्व प्रकारची आरोग्य तपासणी, सर्वरोग निदान तपासणी व तज्ञ डॉक्टराचे मार्गदर्शन ह्या शिबिरात मिळणार आहे. हृदयरोगतज्ञ व फिजिशियन डॉ. अतुल वडगांवकर, स्त्रीरोगतज्ञ व प्रसुतिशास्त्र तज्ञ डॉ. पूजा वडगांवकर हे महाआरोग्य शिबिरात सहभागी होऊन रुग्णांना सेवा देणार आहेत. आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सतर्क राहून योग्य वेळी तपासणी आणि उपचार घेतल्यास दुर्धर आजारांना आपण दुर ठेवू शकतो. म्हणून सर्वांनी ह्या मोफत महाआरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा नियोजन समिती सदस्य आरोग्यसेवक गोरख बोडके यांनी केले आहे.