इगतपुरीनामा न्यूज, दि. 14
इगतपुरी तालुक्यासाठी आज दिलासादायक बातमी आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार फक्त 11 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. आज दिवस अखेर 285 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य यंत्रणेसह सर्वच यंत्रणा कोरोना लढा तीव्रतेने लढत आहे. आज रात्री 8 वाजेपासून राज्य शासनाने घोषित केलेली कडक संचारबंदी सुरू होत आहे. ह्या काळात इगतपुरी, घोटी, वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या प्रशासनाने कठोर नियोजन केले असून नागरिकांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.
इगतपुरी तालुक्यातील बहुतांशी ग्रामीण भाग कोरोनापासून सुरक्षित असला तरी काही आदिवासी गावांमध्ये महामारीचा प्रवेश झाला आहे. इगतपुरी, घोटी शहरातही रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन, महसूल यंत्रणा जीवाचे रान करीत आहे.
बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषधी
सध्या कोरोनाची धास्ती सर्वांनाच आहे.. अगदी कोणतेही उपचार घ्यायची लोकांची तयारी आहे, अशा परिस्थितीत किफायतशीर दरात उपलब्ध असलेलं बर्फानी आरोग्य प्लस हे आयुर्वेदिक प्रतिबंधक औषध आहे. रुग्णांसाठी बर्फानी आरोग्य प्लस म्हणजे फक्त औषध नाही, तुमच्या प्रियजणांसाठी ते सुरक्षा कवच आहे! 7038394724