भिमजयंती निमित त्र्यंबकेश्वर येथे महामानवाला अभिवादन

इगतपुरीनामा न्यूज, दि. १४ ( ज्ञानेश्वर महाले, त्र्यंबकेश्वर )
ज्ञानाचा अथांग महासागर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, त्र्यंबकेश्वरचे पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर व प्रबोधनात्मक जयंती साजरी करुन अभिवादन करण्यात आले.
त्र्यंबकेश्वर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सकाळी ९ : ३० मिनिटांनी अभिवादन कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी आमदार हिरामण खोसकर, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव अध्यक्ष उमेश सोनवणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष आदित्य भालेराव, कार्याध्यक्ष आकाश सोनवणे उपस्थित होते. यावेळी धम्म उपासक सुभाष सोनवणे यांनी बुद्ध वंदना व भिमस्मृती घेतली. जयंती महोत्सव यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष उमेश सोनवणे, उपाध्यक्ष आदित्य भालेराव, मोहन सोनवणे, आकाश सोनवणे, मिलिंद तिवडे, भाऊराव सोनवणे, विजय गांगुर्डे, भुषण सोनवणे, ऋतिक सोनवणे, हिमांशु सोनवणे, प्रकाश दोंदे, मोहित ढेंगळे, अविनाश जाधव, बबलू काकवीपूरे, रोशन खैरनार, सौरभ खाटिकडे, हर्षद सोनवणे, पवन भालेराव, कुणाल सोनवणे, प्रशांत सोनवणे, अजय दोंदे, कैलास काकवीपूरे आदींनी परिश्रम घेतले. नाचून मोठे होऊ नका वाचून मोठे व्हा ‘ या संदेशाप्रमाणे भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत समाज घडवण्यासाठी त्र्यंबकेश्वर जयंती महोत्सव निमित्त अध्यक्ष उमेश सोनवणे यांनी पंचशील मित्र मंडळाच्या वतीने निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धेमध्ये नूतन त्र्यंबक विद्यालय ,अभिनव विद्यालय व बाहय विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्च शिक्षण घेऊन अनेक संकटाचा सामना केला. त्यांनी भारतातील तळागळातील घटकांना न्याय संविधानाच्या माध्यमातून संदेश दिला आहे. सार्वजनिक जयंती महोत्सवाच्या वतीने सर्व नियमांचे पालन करुन बाबासाहेबांना अभिप्रेत समाज घडविण्यासाठी त्र्यंबकेश्वरला विविध शैक्षणिक स्पर्धा  उपक्रम घेऊन ख-या अर्थाने बाबासाहेबांना अभिवादन केले आहे. विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचा आदर्श घेऊन जीवनात वाटचाल करावी.
हिरामण खोसकर, आमदार

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!