तोंडावर आली दिवाळी, पिकांना मारक ठरला अवकाळी : नुकसानभरपाईची सर्व भागातून होतेय मागणी

निलेश काळे : इगतपुरीनामा न्यूज, दि. 17

दुपारपासून कोसळणाऱ्या परतीच्या धगफुटीसदृश्य पावसाने भात पीके आडवे झाले आहेत. भाताची खाचरे पुर्णतः भरले असून काठोकाठ पाणी आहे. भात पीक आडवे झाल्याने धान कुजणार आहेच शिवाय जनावरांसाठीचा पेंढा देखील सडणार आहे. एकंदरीत भात पीकाचे उत्पादन घटणार असून शेतकरी चिंतातुर झाला आहे. खरीप हंगाम सरुन रब्बी हंगाम सुरू होण्यास प्रारंभ होऊन रब्बी हंगामाच्या पीकांच्या लागवडीस सुरुवात होत आहे. साधारणपणे दसरा दिवाळीवेळी खरीप हंगामाच्या पिकांची काढणी होत असते. इगतपुरी तालुक्यातील सर्वच भागांत भात, सोयाबीन, नागली, वरई आदी पीके काढणीसाठी तयार झाली आहे. मात्र पावसाने सगळ्या शेतकऱ्यांच्या पिकाची वाट लावली आहे.

भात पीकांतील निमगरी, हाळी जातीच्या सर्वच वाणे काढणीसाठी आली असून पावसामुळे काढणीस विलंब होत आहे. परतीच्या अवकाळी पावसाने ओहोळ-नाले पून्हा पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहेत. भात पीक आडवे झाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अश्रुंनी भिजली आहे. इगतपुरीच्या जिराईत जमिनीवर तसेच माळरानावर होणाऱ्या सोयाबीनच्या शेंगा देखील ऊन-पावसाने तडकून सोयाबीन उडून जावू लागली आहे. काही ठिकाणी तर शेंगा काळ्या पडून लागल्या आहे. भात, सोयाबीन पीकाचे सारखीच अवस्था असल्याने व दिवाळसण तोंडावर आल्याने सण कसा साजरा करायचा हा पेच शेतकऱ्यांना पडला आहे.

ऐन सणासुदीच्या काळात खरिपाच्या पहिल्या टप्प्यातील पीक निघत असते. यंदा मात्र अवकाळीने बेजार केले असून हातचे पीक जाण्याची वेळ आली आहे. पंचनामे करून भरपाई व पीकविमा मंजूर करण्यात यावा.
  - संतोष वारुंगसे, बेलगाव तऱ्हाळे
 

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!