भावली खुर्द येथे नवरात्री व गांधी जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न : प्रल्हाद ओंकारवती फाऊंडेशनतर्फे शिबिराचे आयोजन

इगतपुरीनामा न्यूज, दि. 3

अतिदुर्गम आदिवासी भागातील भावली खुर्द येथे आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी व ग्रामसेवक रुपाली जाधव यांच्या समन्वयाने मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबीर संपन्न झाले. प्रल्हाद प्रल्हाद ओंकारवती फाऊंडेशनच्या अध्यक्ष डॉ. मनुश्री मुखर्जी, डॉ. राजेश देसाई व संस्थापक सदस्य शशिकांत नंदनवार यांनी गावातील व वाडीतील महिलांच्या विविध आजारांवर निःशुल्क तपासणी व औषध वाटप केले.  या शिबिरात किशोरवयीन मुली व महिला यांना मोफत  सॅनिटरी नॅपकिन्स वाटप करण्यात आले. ह्या शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रल्हाद ओंकारवती फाऊंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी वाड्या पाड्यांवर गोरगरीब जनतेसाठी आरोग्य शिबीरे आयोजन करत आहेत. ग्रामस्थांनी यावेळी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.

आर्थिक परिस्थितीमुळे वैद्यकीय उपचार घेऊ शकत नाही अशा लोकांसाठी मोफत आरोग्य शिबीरे घेऊन मोफत औषध वाटप केली जात आहेत. या शिबिराला सरपंच जिजाबाई आगिवले, उपसरपंच दौलत भगत, ग्रामपंचायत सदस्य चांगुणा  आगिवले, सायजाबाई उबाळे, आरोग्यसेवक बिपीन नेवासकर, नितीन सोनवणे, चंद्रकांत आगिवले, लंका उबाळे आदी उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने ग्रामसेविका रुपाली जाधव यांनी शिबीर यशस्वी करून महिला व डॉक्टर यांचे आभार मानले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!