मोगरे येथे लेखक डॉ. शरद बाविस्कर यांचे हस्ते एसएनएफच्या 15 व्या वाचनालयाचे लोकार्पण

  • गाव तेथे वाचनालय -अमेरीकेतील रीयल डायनॅमीक्सच्या सामाजिक सहभागातून वाचनालय चळवळ

इगतपुरीनामा न्यूज दि. ०२ : तालुक्यातील दुर्गम गाव मोगरे येथे एसएनएफ वाचनालयाचे उदघाटन लेखक आणि विचारवंत डॉ. शरद बाविस्कर यांच्या हस्ते दिमाखात संपन्न झाला. धुळे जिल्ह्यातील सुपुत्र असलेले शरद बाविस्कर सध्या दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापिठात तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. सध्या त्यांचे भुरा हे आत्मवृत्त महाराष्ट्रात अतिशय गाजत आहे. ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजावी यासाठी सोशल नेटवर्किंग फोरमने सुरु केलेल्या वाचनालय चळवळीअंतर्गत हे १५ वे वाचनालय आहे. याप्रसंगी एसएनएफचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, सरपंच सीताबाई जाखेरे, समन्वयक रामदास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

“ग्रामीण भागातील मुलं पुस्तकांपर्यंत पोहोचू शकत नसल्याने पुस्तकांना मुलांपर्यंत पोहोचवण्याची मोठी गरज आहे. फुले दांपत्याने सुरु ऐतिहासिक कार्य सोशल नेटवर्किंग फोरम ही संस्था करत आहे ही अभिमानाची बाब आहे” असे प्रतिपादन याप्रसंगी प्रमुख पाहुणे आणि जेएनयूचे प्राध्यापक शरद बाविस्कर यांनी केले. पुस्तकं तर पोहोचली पण आता रोज वाचनालयात येऊन पुस्तकं वाचण्याचे काम मात्र गावातील विद्यार्थ्यांना करावे लागेल असेही त्यांना पुढे बोलताना सांगितले.

गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या या चळवळीची माहिती सोशल मिडीयावरूनच या अनोख्या ग्रामीण वाचनालय चळवळीची माहिती थेट अमेरिकेत स्थायिक असलेले लासलगावचे सुपुत्र योगेश कासट यांच्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या रिअल डायनॅमीक्स या आयटी कंपनीतील संचालक योगेश डागा, राहूल मोहता आणि साकेत शहा यांनी त्वरीत आर्थिक तरतूद करून द्यायचं कळवलं. त्यांच्याच आर्थिक दातृत्वातून मोगरे येथे हे वाचनालय सुरु झाले आहे. मोगरे ग्रामपंचायतने वाचनालयासाठी इमारत उपलब्ध करून दिली तसेच पुढील देखभाल मोगरे गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी आणि स्वयंसेवक करणार आहेत. एसएसएफच्या वतीनेही भविष्यात आवश्यक ती पुस्तकं आणि साहित्य उपलब्ध करून दिले जाईल.या सामाजिक चळवळीत अमेरिकेहून रियल डायनॅमिक्स, ग्रामपंचायत मोगरे, सोशल नेटवर्किंग फोरम यांनी महत्वाचे योगदान दिले.

मोगरे ता. इगतपुरी येथे सोशल नेटवर्कींग फोरम वाचनालय लोकार्पण प्रसंगी लेखक डॉ. शरद बाविस्कर, प्रमोद गायकवाड, रामदास शिंदे, सरपंच सिताबाई जाखेरे आदी

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद गायकवाड, सुत्रसंचलन हरिश्चंद्र भाग्यवंत तर आभार प्रदर्शन प्रताप जाखेरे यांनी केले
उदघाटन सोहळा यशस्वी करण्यासाठी मुखाध्यापक वैभव उपासनी, निवृत्ती नाठे, वैभव बिरारी, ग्रामसेवक उत्तमगिरी गोसावी, गोविंद जाखेरे, प्रताप जाखेरे, संदीप डगळे, रामदास दिवे, नंदू जाखेरे, अमित जाखेरे, संदीप गवारी, सचिन उपडे, खुशाल भोईर, यांनी प्रयत्न केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!