रायगडनगर जवळ मध्यरात्रीच्या अपघातात नाशिकचे २ जण गंभीर जखमी : नरेंद्राचार्य महाराज रुग्णवाहिकेने केले मदतकार्य

इगतपुरीनामा न्यूज, दि. 25

मुंबई आग्रा महामार्गावर रायगडनगर जवळ मध्यरात्रीच्या सुमारास इको कार आणि वॅगनर कारचा अपघात झाला. इको कार क्रमांक MH 03 BJ 0781 ही वळण घेत असताना मागून येणाऱ्या वॅगनर कार क्रमांक MH 15 FT 7580 ने जोरदार धडक दिली. या अपघातात दिगंबर शांताराम सहाणे वय 32, हेमंत दत्तात्रय चौधरी वय 33 राहणार नाशिक रोड हे 2 जण गंभीर जखमी झाले. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!