नासिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या ४ जणांकडून ४८ तासात अष्टविनायक सायकल यात्रा पूर्ण

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५

राजेंद्र वानखेडे यांच्या प्रेरणेने दोन वर्षांपासून सुरू झालेल्या अष्टविनायक सायकल यात्रेसाठी नासिक सायकलिस्ट फाउंडेशन नेहमीच सक्रिय असते. त्यानुसार फाउंडेशच्या चार सदस्यांनी अवघ्या 48 तासात 500 किमी सायकलींग 350 किमी बॅकअप वाहनाने नासिक ते अष्टविनायक ते नाशिक  यात्रा यशस्वीपणे पूर्ण केली. अष्टविनायक राईडचे सर्व स्तरातून कौतुक होत आहेत. अष्टविनायकचा परिसर म्हटल्यावर  डोंगराळ, चढउतार, पावसाळ्यात पूर्ण नटून थटून हिरवा शालू नेसलेला परिसर अन त्यात पुण्यातील खंडाळा, लोणावळा घाट पार करून सर्व अष्टविनायकांचे प्रत्यक्ष दर्शन या रायडर्सनी घेतले.

ही राईड यशस्वी करण्यासाठी नासिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर माने, उपाध्यक्ष जगन्नाथ पवार, सचिन नरोटे, नलिनी कड, अरुण पवार, संजय बारकुंड, किशोर काळे आदींचे मार्गदर्शन लाभले. अष्टविनायक सायकल यात्रेमध्ये सहभागी बजरंग कहाटे, दिनकर पाटील, प्रमोद तुपे, संजय पवार यांनी सहभागी होऊन ती पूर्ण केली. सर्वांचे नाशिक जिल्ह्यात विशेष कौतुक केले जात आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!