इगतपुरीनामा न्यूज, दि. 11
इगतपुरी तालुक्यात आज 24 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपचार घेणाऱ्या तालुक्यातील कोरोना रुग्णांची रुग्णांची संख्या 340 इतकी झाली आहे. विकेंड लॉकडाऊनला तालुक्यातील सर्व भागांमध्ये चांगला प्रतिसाद लाभला. येणारा काळ अतिशय खडतर असून रुग्णांची संख्या वाढली तर संपूर्ण यंत्रणा कोलमडून पडण्याचा धोका आहे.
काही कुटुंबांतील रुग्ण नाशिक येथे उपचार घेत असल्याने त्यांना लागणाऱ्या इंजेक्शनसाठी इगतपुरी तालुक्यातील अनेकांना साकडे घालण्यात आले. तथापि अनेकांनी प्रयत्न करूनही संबंधित इंजेक्शन उपलब्ध होऊ शकले नाही. यासह बेडच्या उपलब्धते बाबतही हीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन न केल्यास गंभीर परिस्थिती उभी ठाकणार आहे. धोका टाळण्यासाठी मास्क, सॅनिटायझर वापरावे. घराबाहेर पडू नये. रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारी औषधे घ्यावी. व्यायाम करावे असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषधी
सध्या कोरोनाची धास्ती सर्वांनाच आहे.. अगदी कोणतेही उपचार घ्यायची लोकांची तयारी आहे, अशा परिस्थितीत किफायतशीर दरात उपलब्ध असलेलं बर्फानी आरोग्य प्लस हे आयुर्वेदिक प्रतिबंधक औषध आहे. रुग्णांसाठी बर्फानी आरोग्य प्लस म्हणजे फक्त औषध नाही, तुमच्या प्रियजणांसाठी ते सुरक्षा कवच आहे ! 7038394724