गरीब कुटुंबातील उमेदवार लकीभाऊ जाधव विरोधातील भांडवलदार प्रवृत्तीला हद्दपार करून लकीभाऊ जाधव यांना निवडून द्या – माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात : लकीभाऊ जाधव ह्या क्रियाशील कार्यकर्त्याला संधी देऊन मतदारसंघ विकसित करा – खा. राजाभाऊ वाजे : धरणातील पाणी आधी तालुक्याला मगच मुंबई व मराठवाड्याला – काँग्रेस उमेदवार लकीभाऊ जाधव

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील लकीभाऊ जाधव हा उमेदवार सामान्य जनतेचे प्रतीक असणारा गरीब कुटुंबातील उमेदवार आहे. महाराष्ट्र राज्यात प्रत्येक कानाकोपऱ्यात लकीभाऊ जाधव हा लढवय्या तरुण लोकप्रिय आहे. ह्याच लकीभाऊच्या माध्यमातून ह्या मतदारसंघातील भांडवलदारांचा अहंकार मोडून टाकायचा आहे. यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, इंदिरा काँग्रेस आणि मित्रपक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागलो आहोत. प्रचारकाळात लकीभाऊ जाधव यांच्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभा घेणार आहोत. इगतपुरी त्र्यंबकेश्वरच्या जनतेने लकीभाऊ जाधव यांना विधानसभेत पाठवण्यासाठी आता संकल्प केला आहे असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी इगतपुरी येथे केले. इगतपुरी येथील घाटनदेवी मंदिरात नारळ फोडून आज प्रचाराला सुरुवात करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महाविकास आघाडीतर्फे लकीभाऊ जाधव यांना आपल्याला आमदार म्हणून निवडून आणायचे आहे. अशा क्रियाशील कार्यकर्त्याला संधी देऊन मतदारसंघाला विकसित करावे. सक्षमतेने रात्रंदिवस जनसेवेला वाहून घेणाऱ्या लकीभाऊ जाधव यांच्यासाठी आम्ही सोबत राहून विजयी करण्यासाठी परिश्रम घेऊ. 

धनदांडग्या आणि भांडवलदारांच्या विरोधातील ही लढाई असून सामान्य गरीब कुटुंबातील माझ्यासारख्या सामान्य युवकाला इगतपुरी विधानसभा मतदारसंघात मायबाप जनतेने निवडून द्यावे. मतदारसंघाला सक्षमतेने संगमनेरच्या धर्तीवर विकसित करण्याचे माझे स्वप्न आहे. इथल्या धरणातील पाणी पहिल्यांदा इथल्या जनतेला आणि शेतकऱ्यांना मगच मुंबई मराठवाड्याला जाऊ देईल. ही निवडणूक माझ्यासारख्या गरीबाच्या विरोधात श्रीमंत लोकांनी उभी केली असली तरी मला इथली सुज्ञ जनता मला निवडून देईल असा विश्वास इगतपुरी मतदारसंघातील इंदिरा काँग्रेसचे उमेदवार लकीभाऊ जाधव यांनी व्यक्त केला नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, युवक जिल्हाध्यक्ष राहूल पानगव्हाणे, प्रदेश सचिव ज्ञानेश्वर गायकवाड,माजी जिल्हा परिषद सदस्य शिवसेना नेते हरिदास लोहकरे,प्रदेश सचिव उमेश खातळे,अनू जाती जिल्हाध्यक्ष किरण जाधव, काँग्रेस तालुकाध्यक्ष रामदास धांडे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष आदी पदाधिकारी उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. 

Similar Posts

error: Content is protected !!