इगतपुरीनामा न्यूज, दि. १५
पिंपळगाव घाडगा येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. सरपंच देविदास देवगिरे यांच्या पुढाकारातून ग्रामपंचायतीतर्फे शाळेला स्मार्ट डिव्हीडी देण्यात आली. पोलीस दलात कार्यरत असलेल्या भूमीपुत्रानी कार्यक्रमात सर्वांच्या वतीने शाळेला लवकरच प्रिंटर देणार असल्याचे सांगितले. गावातील आयटी इंजिनियर संदीप देवगिरे यांनी शाळेला शैक्षणिक कामी पाच हजार रोख रक्कम देण्यात आली. पंढरी देवगिरे, पत्रकार एकनाथ शिंदे यांनी शाळेला प्रोजेक्टर देणार असल्याचे घोषणा केली. यावेळी सरपंच देविदास देवगिरे, उपसरपंच ज्ञानेश्वर आहेर, माजी सभापती जोशी, मुंबई पोलीस धनाजी भांगरे, किरण घाडगे, नरेंद्र गोणके, शंकर भांगरे, संतोष गोडे, अनिता गोणके, मोहन गोणके, नवनाथ जोशी, आकाश जोशी, राजू जोशी, मदन खोकले, संदीप देवगिरे, धनाजी गोणके, अनिल घाडगे, राजू गोडे, विष्णू देवगिरे, संतोष कर्पे, समाधान गोणके, दशरथ जोशी, तानाजी देवगिरे, समाधान जोशी, गोकुळ देवगिरे, शंकर गवळे, किरण जोशी,अंकुश आहेर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.