पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मोडाळे ग्रामपंचायतीला आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम पुरस्कार वितरण संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

इगतपुरी तालुक्यातील मोडाळे गावाने विकासामध्ये केलेली क्रांती उल्लेखनीय असून विविध क्षेत्रात मिळवलेले यश सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. मोडाळे ग्रामपंचायतीला नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत आर. आर. ( आबा ) पाटील तालुकास्तरीय प्रथम सुंदर ग्रामपंचायत पुरस्कार वितरण करतांना आनंद वाटतो असे प्रतिपादन नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. सरपंच मंगला बोंबले, ग्रामसेवक नानासाहेब खांडेकर, राहुल बोंबले यांनी मंत्रिमंहोदयांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.

यावेळी ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आमदार देवयानी फरांदे, राहुल ढिकले आदी उपस्थित होते. मोडाळे गावात जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने विकासाचा आलेख वाढत आहे. विविध पुरस्कार, विविध योजना आणि ग्रामस्थांची सामाजिक एकता जपली गेली आहे. आज मिळालेल्या पुरस्काराने माझ्या मोडाळे गावकऱ्यांना सॅल्यूट करतो असे जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके म्हणाले आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!