श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त घोटीत बैठक संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. १४

नाभिक समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्री संत सेना महाराज पुण्यतिथीची नाभिक समाजाकडून तयारी सुरू झाली आहे. सर्वांनी एकत्र येऊन संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करावी असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ कडवे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कडवे यांनी केले. इगतपुरी तालुका समस्त नाभिक समाजाची आढावा बैठक घोटी येथे पार पडली. यावेळी त्यांनी नाभिक बांधवाना आवाहन केले.

श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त कोणते कार्यक्रम राबवायचे याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. पुण्यतिथीच्या अनुषंगाने भजन, कीर्तन, महाप्रसाद आदी कार्यक्रम करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. यावेळी नाभिक समाजाच्या विविध विकासात्मक प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. याप्रसंगी नाभिक समाजातील विविध ठिकाणचे पदाधिकारी, समस्त नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री संत सेना महाराज पुण्यतिथीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!