इगतपुरीनामा न्यूज, दि. 10
नाशिक येथील प्रा. सायली सीताराम गोसावी या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पात्रता चाचणी परीक्षेत ( सेट) इंग्रजी विषयात उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांना प्राचार्य सीताराम गोसावी, उपप्राचार्या डॉ. सीमा गोसावी, प्रा. देविदास गिरी, प्रा. छाया लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले. यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पेट परीक्षा देखील त्या उत्तीर्ण झालेल्या आहेत. सध्या त्या औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात इंग्रजी विषयाच्या सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. या यशाबदल प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड, प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे, प्राचार्य डी. के. गोसावी, प्राचार्य डॉ. श्रीनिवास जोशी यांनी अभिनंदन केले आहे.
Comments