इगतपुरी तालुक्यात आज वाढले ‘एवढे’ रुग्ण !

इगतपुरीनामा न्यूज, दि. 9
इगतपुरी तालुक्यात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 51 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. आज दिवस अखेर 450 पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य यंत्रणेसह सर्वच यंत्रणा कोरोना लढा तीव्रतेने लढत असून नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून सहकार्य करण्याची गरज आहे. दरम्यान वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोना योद्धया आरोग्य सेविका मीरा ठाकूर यांचे आज निधन झाले. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर घोटी ग्रामपालिकेने उद्या दि. 10 ते 18  एप्रिल पर्यंत घोटी शहरात जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय घोषित केला आहे.
इगतपुरी तालुक्यातील बहुतांशी ग्रामीण भाग कोरोनापासून सुरक्षित असला तरी काही आदिवासी गावांमध्ये महामारीचा प्रवेश झाला आहे. इगतपुरी, घोटी शहरातही रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने चिंतेचे सावट पसरले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन, महसूल यंत्रणा जीवाचे रान करीत आहे. मात्र काही नागरिक नियमांना हरताळ फासत असल्याने कोरोनाचा उद्रेक वाढण्यास मदत होते आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कोरोनाचा सामना करण्यासाठी घालून दिलेले नियम पाळावेत. अति महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे.

बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषधी

सध्या कोरोनाची धास्ती सर्वांनाच आहे.. अगदी कोणतेही उपचार घ्यायची लोकांची तयारी आहे, अशा परिस्थितीत किफायतशीर दरात उपलब्ध असलेलं बर्फानी आरोग्य प्लस हे आयुर्वेदिक प्रतिबंधक औषध आहे. रुग्णांसाठी बर्फानी आरोग्य प्लस म्हणजे फक्त औषध नाही, तुमच्या प्रियजणांसाठी ते सुरक्षा कवच आहे! 7038394724