घोटीत उद्यापासून 18 एप्रिल पर्यंत जनता कर्फ्यु

इगतपुरीनामा न्यूज, दि. 9
इगतपुरी तालुक्यातील महत्वपूर्ण असणाऱ्या घोटी शहरात ग्रामपालिका आणि समस्त गावकरी मंडळीने जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपालिकेने प्रसिद्धी पत्रक काढून घेतलेला निर्णय खालीलप्रमाणे आहे.

सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, घोटी गावात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखणेबाबत उपाय योजना करणेसाठी आज शुक्रवार दि. 9 रोजी ग्रामपालिका घोटी बुद्रुक येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. ह्या बैठकीमध्ये समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने विविध उपाय योजना
करण्यात आलेल्या आहेत. तरी घोटी शहरातील सर्व व्यापारी व नागरीकांनी याची नोंद घ्यावी

■  दि. 10 ते दि. 18 एप्रिल पर्यंत घोटी बुद्रुक शहरात जनता कर्फ्यु लागु केल्याचा निर्णय घेतला असल्याने ह्या काळात गाव पुर्णपणे बंद राहील.

■ ह्या काळात दवाखाने व मेडीकल हे सुरळीत चालु राहतील

■ दुध विक्री सकाळी २ तास व सायंकाळी २ तास सुरु राहील

■ जनता कर्यु झाल्यानंतर प्रत्येक दुकानदाराने कोरोनाची टेस्ट करुन घेवुनच दुकान सुरु ठेवावे.

■ ज्या दुकानदारांच्या कुटुंबात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असतील त्यांनी आपले दुकान १४ दिवस बंद ठेवावे.

जनता कर्फ्यु कालावधीत कोणीही विनाकारण रस्त्यावर फिरु नये. घरीच थांबुन प्रशासनास सहकार्य करावे.

समस्त गावकरी मंडळी घोटी बुद्रुक
ग्रामपालिका घोटी बुद्रुक
ता. इगतपुरी, जि. नाशिक

बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषध

सध्या कोरोनाची धास्ती सर्वांनाच आहे.. अगदी कोणतेही उपचार घ्यायची लोकांची तयारी आहे, अशा परिस्थितीत किफायतशीर दरात उपलब्ध असलेलं बर्फानी आरोग्य प्लस हे आयुर्वेदिक प्रतिबंधक औषध आहे. रुग्णांसाठी बर्फानी आरोग्य प्लस म्हणजे फक्त औषध नाही, तुमच्या प्रियजणांसाठी ते सुरक्षा कवच आहे! 7038394724