सलुन व ब्युटी पार्लर व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्या ; इगतपुरीच्या तहसीलदारांना निवेदन

इगतपुरीनामा न्यूज, दि. 8
नाभिक समाज अत्यंत होतकरु व गरीब असून आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे. नाभिक समाजाला सलुन व्यवसाया शिवाय इतर कोणतेही उदरनिर्वाहाचे व उत्पन्नाचे साधन नाही. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सलुन दुकाने बंद ठेवल्यामुळे नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. नाभिक समाज, सलुन दुकानदार हे शासनाने ठरवून दिलेल्या विशिष्ट अटी शर्तीचे तंतोतंत पालन करण्यास तयार आहेत. त्याच प्रमाणे कोरोना महामारीचा प्रादुर्भाव होणार नाही याची योग्य ती सर्व प्रकारची  काळजी व दक्षता घेऊन दुकाने चालु ठेवण्यास तयार आहे. अशा परिस्थितीत किमान विशिष्ट अटी व शर्ती अन्वये नाभिक समाजास तथा सलुन दुकानदारांना सलुन दुकाने
चालु ठेवण्यास परवानगी मिळणे न्यायहिताच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. असे निवेदन आज इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना देण्यात आले. नाभिक बांधवांच्या भावना शासनापर्यंत पाठवू असे यावेळी तहसीलदारांनी सांगितले.
विविध मागण्यांचे हे निवेदन नाभिक समाज सलून असोसिएशन इगतपुरी तालुका, नाभिक एकता महासंघ आणि समस्त नाभिक समाज इगतपुरी तालुक्याच्या वतीने इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात आले. निवेदन देतेवेळी सलून असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष एकनाथ शिंदे, इगतपुरी तालुकाध्यक्ष मच्छिन्द्र कोरडे, अँड. सुनिल कोरडे, जिल्हा संघटक अशोकराव सूर्यवंशी, तालुका सरचिटणीस किरण कडवे, जेष्ठ नाभिक नेते अमोल कडवे, समाज रक्षक वैभव कोरडे, राजाभाऊ बिडवे, सामाजिक कार्यकर्ते रवी कोल्हार, इगतपुरी शहराचे जेष्ठ पदाधिकारी मच्छिन्द्र बिडवे, सुमित अनारे, संत सेना मंदिर सेवेकरी अमोल गणपत कडवे आदी बांधव उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!