महावितरणच्या पठ्ठ्याची कमाल – अर्धा किमी पोहत जाऊन खांबावर चढून विजेची केली दुरुस्ती : इगतपुरी तालुक्यातील वीज कर्मचाऱ्याच्या अभूतपूर्व कामाची चर्चा

इगतपुरीनामा न्यूज, दि. २५

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कर्मचारी जीवावर उदार होऊन काम करतात. असे असले तरी काही कर्मचारी यापेक्षा अभूतपूर्व काम करतात. याचे उदाहरण इगतपुरी तालुक्यातील रायांबे येथे घडले आहे.इगतपुरी तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रायांबे येथील वीजपुरवठा खंडित झाला होता. हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता महावितरणचे कर्मचारी अमोल जागले ( मोबाईल नंबर 8308669270) यांनी महत्वपूर्ण काम केले आहे. ते मुकणे धरणाच्या बॅकवॉटर पाण्याच्या प्रवाहात जवळपास अर्धा किलोमीटर पोहत गेले. पोहत जाऊन त्यांनी खराब झालेला विद्युत पोल गाठला. पोलवर चढून फॉल्ट शोधून वीजपुरवठा पूर्ववत चालू करून सुरळीत केला. अशा आगळ्या वेगळ्या प्रकारे जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे इगतपुरी तालुक्यात कौतुक सुरु आहे. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके, तहसीलदार परमेश्वर कासुळे आदींनी त्यांचे कौतुक केले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!