इगतपुरी तालुक्यातील प्रति पंढरपूर माणिकखांब येथे आषाढीनिमित्त वारकऱ्यांची गर्दी : रामकृष्णहरी नामघोषाने दुमदुमला परिसर ; विविध धार्मिक कार्यक्रम अखंड सुरु

इगतपुरीनामा न्यूज, दि. १०

रुप पाहता लोचनी, सुख झाले वो साजनी आणि पांडुरंगाच्या महिमा वर्णन करणाऱ्या विविध अभंगांचा निनाद, टाळांचा खणखणाट, पखवाज आणि हार्मोनियमची साथ सांगत ह्यांचा मेळ साधून माणिकखांब येथील विठुरायाच्या मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम सुरु आहेत. पहाटेपासून इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. अनेक अडचणींमुळे प्रत्यक्षात पंढरपूरला जाऊ न शकलेल्या भाविकांसाठी हे मंदिर प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर दारणा नदीच्या काठावर असून जणू काही चंद्रभागेच्या तिरावर मंदिर असल्याची प्रचिती सर्वांना येत असते. घोटी येथील आनंदी महिला भजनी मंडळाने सालाबादप्रमाणे घोटी ते माणिकखांब पायी दिंडी काढली. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांनी आदल्या दिवशी ह्या मंदिरात महापूजा केली. यानंतर ते पंढरपुरला वारीसाठी रवाना झाले. चव्हाण परिवाराने आईवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधलेल्या ह्या मंदिरात आज भाविकांच्या सुरक्षेसाठी घोटी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

इगतपुरी मतदारसंघात चांगला पाऊस पडू दे, बळीराजाला चांगले दिवस येवू दे अशी प्रार्थना आमदार हिरामण खोसकर यांनी पूजेच्या वेळी केली. यावेळी गावासह पंचक्रोशीतील भाविकांनी सुद्धा दर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाप्रसंगी इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, मनसेचे जिल्हा संघटक भगीरथ मराडे, ॲड. एन. पी. चव्हाण, ॲड. जी. पी. चव्हाण, माजी सरपंच हरिष चव्हाण, पत्रकार भास्कर सोनवणे, निलेश काळे, माजी उपरपंच विनोद चव्हाण, मनसे नेते दिपक चव्हाण, हभप बन्सीबाबा चव्हाण, हभप एकनाथ बाबा चव्हाण, हभप उत्तमबुवा चव्हाण, हभप लक्ष्मण बाबा चव्हाण, माजी उपसभापती छायाताई चव्हाण आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!