इगतपुरीनामा न्यूज, दि. 6
वाळुंज जि. औरंगाबाद येथुन किंगफिशर कंपनीचे २ हजार 200 बिअरचे बॉक्स घेऊन जाणारा कंटेनर क्रमांक एमएच ४३ बीजी ५४६३ च्या वाहनचालकाला बेशुद्ध करून जबरी चोरी झाली आहे. ४३ लाख २९ हजार ८५६ रुपयाचे २२०० बियरचे बॉक्स आणि 20 लाखांचा कंटेनर असा ६३ लाख २९ हजार ८५६ रुपयाचा माल बळजबरीने चोरी केला. म्हणून २० ते ३५ वयोगटातील गुडु, निलेश, सरदार, पप्पू, विकी, जिसान आणि इतर काही अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घोटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.
बिअर बॉक्स घेवुन मुंबई येथे जात असताना गंगापुर जि. औरंगाबाद येथून कंटेनरमध्ये बसलेल्या दोन आरोपी यांनी फिर्यादी मोहम्मद अबुलजैस शेख वय 22 रा. अंडाखोर उत्तरप्रदेश याला दमदाटी केली. कंटेनर नाशिकरोड व सिन्नर असा घेवून जाण्यास सांगुन सिन्नर घोटी रोडला एचपी पेट्रोलपंपाजवळ दुपारी आर्टिका गाडी क्र. एमएच ०४ एफएफ ६३५१ मधून आलेल्या आणखी चार इसमांनी फिर्यादीस दमदाटी केली. फिर्यादी कंटेनरच्या ड्रायव्हर सिटवर बसलेला असताना रुमालाने तोंड दाबुन बेशुध्द केले. फिर्यादीच्या ताब्यातील कंटेनर व बियरचे बॉक्स बळजबरीने घेवून जावून फिर्यादीला नाशिकच्या एका बिल्डींगमध्ये डांबुन ठेवले. यानंतर मोटार सायकलने हरसुल जवळ एका ठिकाणी घेवून जावुन बिअर बॉक्स आणि कंटेनर अदा एकूण ६३ लाख २९ हजार ८५६ रुपयाचा माल बळजबरीने चोरी करुन घेवून गेले म्हणून गुन्हा दाखल झाला आहे.