इगतपुरी तालुक्यात ९६ गावांना ६७९ सौर पथदीप : खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांनी वाडीवऱ्हे येथे फलकाचे अनावरण

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या विशेष प्रयत्नातुन सामाजिक दायित्व निधीतुन आरसीई लिमिटेड कंपनीकडून इगतपुरी तालुक्यातील ९६ गावांना सौर ऊर्जेचे पथदीप मिळणार आहे. या मोहिमेच्या फलकाचे अनावरण वाडीवऱ्हे येथे खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले. या सौर ऊर्जेच्या पथदीपांच्या माध्यमातून तालुक्यातील कानाकोपऱ्यात प्रकाश पोहोचणार आहे. विजेच्या समस्येपासुन देखील खेड्यापाड्यातील जनतेला यामुळे फायदा होणार आहे असे मत यावेळी खा. गोडसे यांनी व्यक्त केले.

इगतपुरी तालुक्यातील ९६ गावात तब्बल ६७९ सौर पथदीप आरसीई लिमटेड या कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहेत. या सौर ऊर्जेच्या नामफलकाचे अनावरण खा. गोडसे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख निवृत्तीपाटील जाधव, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, तालुकाप्रमुख भगवान आडोळे, माजी तालुकाप्रमुख राजेंद्र नाठे, युवासेनेचे जिल्हा समन्वयक समाधान वारुंगसे, माजी सभापती विठ्ठल लंगडे, युवासेना तालुकाप्रमुख मोहन बऱ्हे, विधानसभा प्रमुख देवीदास जाधव, बाळा गव्हाणे, संदीप गव्हाणे, वाडीवऱ्हेचे सरपंच रोहिदास कातोरे, जेष्ठ साहित्यिक पुंजाजी मालुंजकर, रमेश धांडे, विष्णु धोंगडे, हनुमंता गायकवाड, घोटी गटप्रमुख अशोक सुरुडे, वाडीवऱ्हे गटप्रमुख दिलीप मुसळे, गणप्रमुख अंबादास धोंगडे, शाखाप्रमुख नथु कातोरे, पंडित कातोरे, गोविंद डगळे, पुंडलिक मुसळे, साहेबराव झनकर, विलास मालुंजकर, संतोष भाडमुखे, साहेबराव बाबळे आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!