इगतपुरीनामा न्यूज, दि. १३
पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील पत्रकारांना बातम्या संकलन करण्यासाठी अतिदुर्गम भागात व आदिवासी वाड्यापाड्यासह परिसरात जावे लागते. मात्र पावसाळ्यात भिजुन आजारी झाल्यावर अनेक पत्रकारांना जिवीताचा धोका निर्माण होतो. त्यामुळे पत्रकारांची पावसापासुन सुरक्षा व्हावी या हेतुने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा इगतपुरी तालुक्याच्या वतीने पत्रकारांना चांगल्या दर्जाचे पावसाळी रेनकोट मोफत वाटप करण्यात आले.
हॉटेल नर्मदा येथे पत्रकार संघाच्या बैठकी प्रसंगी सर्व पदाधिकारी व सदस्यांना रेनकोट देण्यात आले. याप्रसंगी पत्रकारांचा आरोग्य विमा तसेच विविध समस्याबाबत संघटनेच्या वतीने अनेक उपाय योजना अंमलात आणण्यासाठी चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमात पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पोपट गवांदे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पोपट गवांदे , सरचिटणिस राजेंद्र नेटावटे, उपाध्यक्ष राजु देवळेकर, कार्याध्यक्ष शैलेश पुरोहित, संघटक सुमित बोधक, उपाध्यक्ष वाल्मीक गवांदे, कोषाध्यक्ष गणेश घाटकर, सहसंघटक भास्कर सोनवणे, सदस्य विकास काजळे, संदिप कोतकर, सुनिल पहाडीया, एकनाथ शिंदे, लक्ष्मण सोनवणे, समाधान कडवे, शरद धोंगडे, ओंकार गवांदे व पत्रकार मित्र अनिल गभाले उपस्थित होते.