अभिमानास्पद : शिरसाठे ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय माझी वसुंधरा अभियानाचा प्रथम पुरस्कार : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, पर्यावरण मंत्र्यांकडून झाले पुरस्कार वितरण

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५

इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे ग्रामपंचायतीला माझी वसुंधरा अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्याचा पृथ्वी या घटकावर केलेल्या सर्वोच्च कामगिरीसाठी राजस्तरीय प्रथम पारितोषिक मिळाले आहे. मुंबई येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय सोहळ्यात सरपंच गोकुळ सदगीर, ग्रामसेवक हनुमान दराडे आदींनी हा पुरस्कार स्वीकारला. राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, पर्यावरणमंत्री ना. आदित्य ठाकरे यांनी शिरसाठे ग्रामपंचायतीला पुरस्कार वितरण करून गौरव केला. प्रधान सचिव मनीषा पाटणकर म्हैसकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, मुख्य कार्यकारी  लीना बनसोड, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी शिरसाठे ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले आहे. शिरसाठे ग्रामपंचायतीने मिळवलेला गौरव इगतपुरी तालुक्यात अभिमानास्पद असल्याने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेअंतर्गत ग्रामपंचायत गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये शिरसाठे ग्रामपंचायतीचा समावेश झाला आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी शिरसाठे गावाने केलेल्या कामगिरीचा राज्यात सन्मान झाला आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालय यांच्या वतीने अभियान संचालक सुधाकर बोबडे यांनीही अभिनंदन केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, आस्थापना उपायुक्त ज्ञानेश्वर शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ. फडोळ, इगतपुरीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, विस्ताराधिकारी संजय पवार, पृथ्वीराज परदेशी, ज्ञानेश्वर कऱ्हाळे, सरपंच गोकुळ सदगीर, उपसरपंच विलास चंदगीर, ग्रामसेवक हनुमान दराडे, ग्रामपंचायत सदस्य शामसुंदर सोपनर, गणेश तेलंग, रमेश शिद, भास्कर सदगीर, भावराव गांगुर्डे, संपत सप्रे, दिनकर म्हसणे हे यावेळी पुरस्कार वितरण कार्यक्रमाला हजर होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!