भावी वकिलांचा नाशिक मध्यवर्ती कारागृहात अभ्यास दौरा

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

नवजीवन विधी महाविद्यालयाची नाशिक मध्यवर्ती कारागृहामध्ये अभ्यास दौरा पार पडला. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शाहीस्ता इनामदार यांनी वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले,। कारागृह, त्यातील कैद्यांचे जीवन, त्यांची दैनंदिन कार्यप्रणाली याबाबत विद्यार्थांना माहिती होण्यासाठी हा दौरा महत्वाचा आहे. नाशिक मध्यवर्ती कारागृहाचे पोलीस उपनिरीक्षक प्रविण विभांडीक यांनी कैद्यांचे जीवन उलगडून सांगितले. कारागृहाचे स्वरूप बदलून आता त्याचे रूपांतर सुधारगृह आणि पुनर्वसनमध्ये करण्यासाठी सर्व परीने प्रयत्न सुरू असल्याचे सांगत कहेच आमचे ब्रीद असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

जेलमधील प्रशासन आणि कैद्यांचे दैनंदिन व्यवस्थापन तसेच विविध विभागात कैद्यांद्वारे चालणारे काम याबाबत भावी वकिलांनी माहिती घेतली. काही कैदी गणपतीच्या सुंदर मूर्ती बनवत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. शाळा, सरकारी दवाखाने, जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय, न्यायाधीश यांना आवश्यक असलेल्या खुर्च्या याच जेलमधून कैद्यांद्वारे बनवून पाठवून दिल्या जातात. विविध कार्यालयीन फर्निचर  कैद्याच्या कलाकुसरीचा वापर करून बनवले जाते. जे योग्य दरात  विकले जाते. यासाठी  कैद्यांना रोजगार दिला जातो. याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. जेल मधील विविध विभागांची माहिती पोलीस कर्मचारी के. आर. चव्हाण, पूजा कांबळे यांनी  दिली. महिला कैदी बाबत देखील माहिती देण्यात आली. हा दौरा बडे सर यांच्या प्रेरणेने, मंगला पवार यांच्या सहकार्याने घडून आला.

याप्रसंगी अभ्यास दौऱ्याचे प्रत्यक्ष नेतृत्व मार्गदर्शक प्राचार्या डॉ. शाहीस्ता इनामदार यांनी केले. व्हीझिटिंग इनचार्ज प्रा. डॉ. प्रज्ञा सावरकर, प्रा. वैष्णवी कोकणे यांनी सहकार्य केले. यावेळी मध्यवर्ती  कारागृहातील सीनिअर जेलर श्री. झेंडे, श्री. करकार यांचा विद्यालयाच्या वतीने  सत्कार करण्यात आला. या अभ्यास भेटीची सांगता प्रा. मकरंद पांडे यांनी आभार प्रदर्शनातून व्यक्त केली. यावेळी जेल अधीक्षक वाघ साहेब, महाविद्यालय प्रतिनिधी महेंद्र विंचूरकर, अनिल देशमुख यांचे सहकार्य लाभले. एलएलबी द्वितीय आणि तृतीय वर्षाचे जवळपास 70 विद्यार्थी ह्या दौऱ्यात उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!