विक्रम पासलकर : इगतपुरीनामा न्यूज, दि. १४
गेल्या काही महिन्यांपासुन राज्यभर पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी खाजगी पोल्ट्री कंपन्या यांच्या आर्थिक पिळवणुकीविरोधात आपल्या मागण्यांसाठी आक्रमक होऊन संघटीत होत आहेत. राज्य शासन, पशुसंवर्धन विभाग व प्रशासनाशी आपल्या न्याय व हक्कासाठी झगडत आहेत. या पार्श्वभूमीवर अधिकृत व नोंणीकृत संघटना तयार व्हावी अशी जिल्ह्यातील हजारो पोल्ट्री चालक मालकांनी चांदवड़ येथील मेळाव्यात एकमुखी मागणी केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील प्रमुख प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत नाशिकच्या फाळके स्मारक येथे नुकतीच विशेष बैठक पार पडली. या बैठकीत सर्वसंमतीने जिल्हा पोल्ट्री संघटनेची स्थापना करून कार्यकारिणी निवडण्यात आली.
नाशिक पोल्ट्री संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी रोहिदास गायकर, उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर शिंदे, सरचिटणीसपदी गणेश पाटील, सहसरचिटणीस ज्ञानेश्वर माकोणे, कार्याध्यक्ष म्हणून विक्रम पासलकर, खजिनदार-बापू विसपुते, जिल्हा संघटक म्हणून सूरज महाले, गणेश चौरे, गोकुळ दुकळे, ज्ञानेश्वर जाधव, कायदेशीर सल्लागार म्हणून स्वानंद अहिरे, संदीप पाटोळे यांची तर प्रसिद्धीप्रमुख म्हणून उमेश मोरे व कार्यकारिणी सदस्य म्हणून सुनील जाधव, रविंद्र कराडे, वसंत भोसले, दीपक भोर, नवनाथ पगार, संदीप मालुंजकर यांची निवड करण्यात आली. जिल्ह्यातील इगतपुरी, पेठ, देवळा, बागलाण, सिन्नर, मालेगाव या सहा तालुक्यांची कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष रोहिदास गायकर यांचे मार्गदर्शनाखाली नुकतीच निवडण्यात आली. उर्वरित तालुक्याच्या बैठकी 18 मे पर्यंत आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यानंतर काही ठोस निर्णय घेण्यात येणार असुन राज्यस्तरीय संघटना तसेच शासकीय पातळीवर पाठपुरावा करण्यात येणार आहे. नाशिकच्या पोल्ट्री संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्र प्रदेश पोल्ट्री वेल्फेअर संघटनेचे अध्यक्ष संदीप यादव, रायगड संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल खामकर, संभाजी ब्रिगेड कोल्हापुरचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील, विलास साळवी, माजी सभापती कचरू डुकरे, मधुकर जाधव, गोटीराम पाटील, नवनाथ पगार, इगतपुरी तालुकाध्यक्ष वसंत भोसले, पेठ तालुकाध्यक्ष सुनील जाधव, देवळा तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, दीपक झालटे आदींसह जिल्ह्यातील पोल्ट्री बांधवांनी स्वागत केले आहे