इगतपुरीनामा न्यूज, दि. २७
नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची आर्थिक
जननी समजल्या जाणाऱ्या कर्मचारी पतसंस्थेची मासिक सभा नुकतीच पार पडली. त्यात ३१ मार्चअखेर संस्थेचा लेखाजोखा संस्थेचे सचिव संदिप दराडे यांनी संचालक मंडळासमोर मांडला. त्यास सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. संस्थेची स्थापना ६ सप्टेंबर १९८९ रोजी झालेली असुन आजतागायत संस्थेने ऑडीट वर्ग अ राखला आहे. संस्थेची एकुण उलाढाल २५ कोटीच्या पुढे पोहोचली आहे. मार्च अखेर संस्थेचे भागभांडवल ११.०१ कोटी असुन येणे कर्ज १४.१९ कोटी आहे. नफ्याचा आलेख नेहमी उंचावत असणारी नाशिक जिल्ह्यातील एकमेव पतसंस्था म्हणुन संस्था नावारुपाला
येत आहे. संस्थेने सभासदांच्या माध्यमातुन निधी उभारुन कुटुंब कल्याण संरक्षण ठेव योजना सुरु केलेली आहे. त्या योजनेतुन चालु आर्थिक वर्षात ६ सभासदांच्या वारसांना प्रत्येकी १ लाख रुपये मदत म्हणुन संस्थेने दिलेले आहे. कल्याण निधी अनुदान योजनेअंतर्गत ७ सभासदांच्या वारसांना प्रत्येकी २५ हजार रुपये मदत म्हणुन संस्थेने दिलेले आहे. सभासदांचे कुटुंब सक्षम होणेकामी संस्था निश्चितच चांगले काम करण्याचा प्रयत्न करत आहे. अशी माहिती संस्थेचे चेअरमन नितीन पवार यांनी दिली.
ह्या संचालक मंडळाने कार्यभार स्विकारल्यानंतर व्याजाचा दर १३ टक्क्यांवरुन १०.५० टक्के वर आणून सभासदांना दिलासा देण्याचे काम संचालक मंडळाने केलेले आहे. कर्जमर्यादा ३.५० लाखावरुन ७.०० लाखापर्यंत केलेली आहे. संस्थेचे भागभांडवल ३ कोटी ७७ लाखावरुन ११ कोटी १ लाखापर्यंत पोहचले आहे. तसेच नफा ५२.७३ लाख वरुन १ कोटी ३८ लाख रुपये नफा मिळवण्यात संस्थेने यश मिळविले आहे. थकबाकीचे प्रमाण अत्यल्प असुन निव्वळ एनपीए ० टक्के राखल्याबद्दल संस्थेचे जेष्ठ संचालक विजयकुमार हळदे यांनी संस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन, सचिव, संचालक मंडळ, कर्मचारी व सभासदांचे अभिनंदन केले. सभासदांच्या सहकार्यातुन इमारत निधीमध्ये भरघोस वाढ झाल्याबद्धल सभासदांचे सर्व संचालक मंडळाने आभार मानले आहे. वसुली कामी वेळोवेळी सहकार्य केल्याबद्यल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व खातेप्रमुख, सर्व तालुकास्तरावरील खातेप्रमुख यांनी सहकार्य केल्याबद्धल संस्थेचे व्हा. चेअरमन पांडुरंग वाजे यांनी आभार मानले. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन नितीन पवार, व्हा. चेअरमन पांडुरंग वाजे, सचिव संदिप दराडे, संचालक विजयकुमार हळदे, राजेंद्र भागवत, पंडितराव कटारे, गोटीराम खैरनार, मधुकर आढाव, विक्रम पिंगळे, भाऊसाहेब पवार, नितीन भडकवाडे, अमित आडके. किशोर वारे, मंगला बोरसे, विमल घोडके, व्यवस्थापक संदिप सोनवणे, कर्मचारी मिलींद अहिरे, मनोहर गायकवाड उपस्थित होते.