सारस्ते आदिवासी सोसायटीच्या चेअरमनपदी इंजि. विनायक  माळेकर, व्हॉइस चेअरमनपदी प्रकाश भोये बिनविरोध

सुनील बोडके : इगतपुरीनामा न्यूज, दि. २७

सारस्ते ता. त्र्यंबकेश्वर येथील सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी इंजि. विनायक माळेकर तर व्हॉइस चेअरमनपदी प्रकाश भोये यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. यावेळी सोसायटीचे संचालक नारायण महाले, छगन सहारे, अंबादास चौरे, अरविंद कस्तुरे, दिनकर कस्तुरे, मनोहर चौधरी, जयवंत चौधरी, कमल माळेकर, चांगदेव माळेकर उपस्थित होते. माळेकर यांच्या निवडीचे हरसुलच्या माजी जिल्हा परिषद सदस्या इंजि.  रूपांजली माळेकर यांनी स्वागत केले आहे. याप्रसंगी दिलीप चौधरी, लक्ष्मण वाघेरे, योगेश आहेर, मिथुन राऊत, सुरेश गायकवाड, लक्ष्मण मेघे, वामन खरपडे, परशराम मोंढे, जगन पिंपळके, भाऊराज वाघेरे आदींनीही शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. संचालक मंडळाने बिनविरोध चेअरमनपदी माझी निवड केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. येणाऱ्या काळात संस्थेला, शेतकऱ्यांना, सभासदांना विविध स्वरूपात विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे असे नवनियुक्त चेअरमन इंजि. विनायक माळेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

error: Content is protected !!