प्रा. देविदास गिरी : इगतपुरीनामा न्यूज, दि. २७
मविप्रचे संचालक व जिल्हा परिषद लघुपाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता, कर्मचारी बॅंकेचे चेअरमन भाऊसाहेब खातळे हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्ताने अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन शनिवारी ३० एप्रिलला सायंकाळी ५.३० वाजता घोटी टोल नाक्याजवळील इंद्रप्रस्थ लॉन्समध्ये होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहाण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हभप रामकृष्णदास महाराज लहवितकर, खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, आमदार डॉ. सुधीर तांबे, मविप्रच्या सरचिटणीस निलीमाताई पवार, अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, चिटणीस डॉ. सुनिल ढिकले, उपसभापती राघो अहिरे, संचालक मंडळ, नाशिक जिल्हा सहकारी परिषद बँकेचे पदाधिकारी व संचालक उपस्थित राहणार आहेय.