इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी युवा नेते हरिश्चंद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब येथील ग्रामपंचायतीचे ते माजी सरपंच असून त्यांची कारकीर्द तालुक्यात आदर्श मानली जाते.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री ना. छगनराव भुजबळ, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. इगतपुरी तालुक्यातील सर्व गावांत युवकांना राष्ट्रवादीच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे हरिश्चंद्र चव्हाण यावेळी म्हणाले.
राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खा. शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील, पालकमंत्री ना. छगनराव भुजबळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आदींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा युवकांमध्ये निश्चित प्रसार करील असा शब्द नवनिर्वाचित युवक तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र चव्हाण यांनी यावेळी दिला. याप्रसंगी इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, माजी जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, फिरोज पठाण, रतन पाटील जाधव, शहराध्यक्ष वसीम सय्यद, महेश शिरोळे, अरुण पोरजे, माजी उपसभापती विष्णु चव्हाण, विष्णू पाटील राव आदींनी उपस्थित राहून हरिश्चंद्र चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या.