प्रतिकुल परिस्थितीवर मात करून महिलांनी सकारात्मक विचारातून आपले कर्तृत्व सिद्ध करावे – ज्योती देशमुख

इगतपुरीनामा न्यूज, दि.. ९

महापुरुष घडविण्यात महिलांचा मोलाचा वाटा आहे. प्रतिकुल परिस्थितीवर मात करत महिलांनी सकारात्मक विचारातून आपले कर्तृत्व सिद्ध करावे. कोणतेही संकट आले तरी जिद्द सोडू नये असे प्रतिपादन लखमापूर येथील माजी सरपंच ज्योती देशमुख यांनी केले. त्या जागतिक महिला दिनानिमित्त मविप्र समाजाचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, त्र्यंबकेश्वर येथे राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ  व  राज्यशास्त्र विभाग यांच्यावतीने आयोजित ‘जागतिक महिला दिन’ कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के. शिंदे, विजय देशमुख, मेघा शिंदे, कु. अद्विका शिंदे, उपप्राचार्य प्रा. सुरेश देवरे, डॉ. शरद कांबळे, प्रा. डॉ. रमेश निकम, प्रा. निता पुणतांबेकर, प्रा. राजश्री शिंदे, प्रा. दिपाली पडोळ आदी उपस्थित होते.

प्रा. राजश्री शिंदे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. मान्यवरांचा सत्कार प्राचार्य डॉ. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सर्व कनिष्ठ व वरिष्ठ प्राध्यापिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. ए. के. शिंदे यांनी आपल्या मनोगतात तसांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव निर्माण झाली पाहिजे. सावित्रीच्या सक्षम लेकी तयार होण्यासाठी चांगला वसा घेऊन समाजामध्ये एक आदर्श उभा केला पाहिजे. सूत्रसंचालन प्रा. डी. एम. पडोळ, प्रा. ज्ञानेश्वर  माळे यांनी तर आभार प्रा. राजश्री शिंदे मानले. यावेळी सर्व प्राध्यापक वृंद व प्राध्यापकेतर वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!