इगतपुरीनामा न्यूज, दि. ५
इगतपुरी रेल्वे स्टेशनवर बोरिवली येथून चुकलेल्या १२ वर्षीय मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. इगतपुरी रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेने मुलीला पालकांच्या ताब्यात दिल्याने पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक काजवे, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.बी.भाईक, पोलीस उपनिरीक्षक मुरारी गायकवाड यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.
अधिक माहिती अशी की, इगतपुरी येथे कर्तव्यावर हजर असलेले पोलीस हवालदार साळेकर, गवारगुरु, पाटील यांना १२ वर्षाची एक मुलगी रेल्वे स्टेशन इगतपुरी येथे प्लॅटफॉर्म क २ वर एकटी विनापालक मिळुन आली. त्यावरुन तिला इथे येण्याचे कारण विचारले असता तिने समाधान कारक सांगितले नाही. त्यामुळे तिला तिचे काळजी व संरक्षणासाठी रेल्वे पोलीस ठाणे इगतपुरी येथे आणुन विचारणा केली. तिचे नाव खुशी किरण जगताप वय १२ वर्षे रा. बोरीवली असे सांगुन ती
रेल्वेमध्ये चुकुन रेल्वे स्टेशन इगतपुरी येथे आली आहे असे तिने सांगितले. त्यानुसार रेल्वे पोलीस ठाणे इगतपुरी येथील स्टेशन डयुटीवर हजर असलेले कर्मचारी यांनी वेळेवर कार्यतत्परता दाखवुन तिला पोलीस ठाण्यात आणुन पोलीस ठाणे अंमलदार पोहवा भालेराव यांनी तिचे काळजी संरक्षणासाठी पोलिसाची नेमणुक केली. तिच्या पालकांशी संपर्क साधुन तिला तिच्या पालकाचे हवाली केले. त्यावरुन रेल्वे पोलीस ठाणे बोरीवली येथील महीला पोकॉ सुषमा जाधव व बालीकेचे वडील किरण जगताप यांचे ताब्यात दिले. त्यावरुन पोहवा साळेकर पोहवा गवारगुरु, पोहवा भालेराव, पोकॉ पाटील, मपोकॉ मारबदे, पोकॉ निचत यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.