इगतपुरीनामा न्यूज, दि. १३
जीवनात उच्च ध्येय निश्चित करून त्यासाठी अविश्रांत मेहनत घ्यावी. त्यातूनच ध्येयसिद्धीची वाटचाल पूर्ण करण्याचे सुयश मिळते. कायद्याच्या विविध क्षेत्रांत करिअर करण्यासाठी मुबलक संधीचा असून त्याचा पुरेपूर वापर करून उत्तुंग भरारी घ्यावी असे प्रतिपादन नवजीवन एज्युकेशन सोसायटीचे संचालक सुभाष देशमुख ( बडेसर ) यांनी केले. सिडकोमधील नवजीवन विधी महाविद्यालयात ५ वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून श्री. देशमुख बोलत होते. यावेळी नवजीवन एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा विजया देशमुख-बडे, संस्थेचे सचिव विजय काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ चाैधरी, मंगल पवार आदी उपस्थित हाेते.
श्री. देशमुख यांनी पुढे बोलताना म्हटले की, जीवनामध्ये विचार व आचार यांचे योग्य संतुलन राखून उन्नती करण्यासाठी लक्ष्य निश्चित करावे. यामुळेच खरी प्रगती साधावी असे आवाहन त्यांनी शेवटी केले. यावेळी विजया देशमुख यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रभारी प्राचार्या डाॅ. शाहिस्ता इनामदार यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रा. डाॅ. समीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी प्रा. मकरंद पांडे, अनिल देशमुख, महेंद्र विंचुरकर, प्रा. शालिनी घुमरे, प्रा. प्रज्ञा सावरकर, स्वप्निल पवार, जीवन वाघ, मंगल पाटील, वैष्णवी बस्ते यांच्यासह इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.