त्र्यंबकेश्वर तालुक्यात २८ गावांना ४ कोटी १० लाख किमतीच्या पाणी पुरवठा योजना मंजूर : महिलांच्या डोक्यावरील हंडा खांद्यावर आणल्याचे आत्मिक समाधान – आमदार हिरामण खोसकर

ज्ञानेश्वर महाले : इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१

त्र्यंबकेश्वर तालुक्यात अधिकचा पाऊस पडुन सुध्दा शेकडो वाड्यात पाड्याना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्यात गत दोन वर्षात त्र्यंबकेश्वर तालुका टंचाईमुक्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आताही जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेतुन तालुक्यात २८ गावांना ४ कोटी १० लाख किमतीच्या पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या आहेत. महिलांच्या डोक्यावरील हंडा खांद्यावर आणल्याचे प्रयत्न सुरू असून मला हे आत्मीक समाधान तिर्थयात्रा केल्यापेक्षा अधिक असल्याचे आमदार हिरामण खोसकर यांना योजना मंजुरीची माहिती देतांना  सांगितले.

जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेतुन मंजुर झालेले पाणीपुरवठा कामे अशी आहेत. वरसविहीर पैकी मांजरमाळ, वरसविहीर, धाडोशी, झारवड बुडरक, टाकेहर्ष, पिंप्री, हट्टीपाडा, अंबई, चौरापाडा, खरवळ, कोशीमपाडा, आळीचा पाडा मुलवड, मानीपाडा, सादडपाडा, बारीमाळ, सावरपाडा, बुरूडपाडा, उंबरणेपाडा, शिवाजीनगर, वेळे, होलदारनगर, सोमनाथनगर, डोळओहोळ, काकडपाणा, बेहेडपाणा, काथवडपाडा, कडेगव्हाण, विराचापाडा.

त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील २८ गावांना जिल्हा वार्षिक आदिवासी   उपयोजनेतुन पाणी पुरवठा तसेच त्यास पुरक अशा  ४ कोटी १० लक्षच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. प्रत्येक गाव पाड्यावर पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.
- हिरामण खोसकर, आमदार इगतपुरी त्र्यंबकेश्वर

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!