इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ – शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार आत्मसात असणारे छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे यांनी सर्वाना एकत्र करून इगतपुरी तालुक्यात अनेक सामाजिक कामाने ठसा निर्माण केला आहे. त्यांनी यापुर्वी मुंढेगाव अस्वली रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासह अनेक गोरगरिबांना न्याय दिला आहे. ते स्थानिकांना रोजगार देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत असतात. त्यांच्या कार्याची कामाची दखल घेऊन प्रहार सैनिक कल्याणच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांना माजी सैनिक फुलचंद पाटील, विजय पवार, दिनकर पवार, गजानन पळशीकर, जगन्नाथ शिरसाठ, सार्जंट चौधरी, वीर नारी विद्या सानप, कविता साळवे, सुवर्णा शिंदे यांच्या हस्ते इगतपुरी रत्नगौरब पुरस्कार देण्यात आला.
प्रहार सैनिक कल्याण संघाचे जिल्हाध्यक्ष विजय कातोरे, उपाध्यक्ष तानाजी चौधरी, कार्याध्यक्ष किसन हंबीर, सचिन शिंदे, नितीन चव्हाण, हरीश चौबे, महिला अध्यक्षा रेखा खैरनार, शैला पाचरणे, आसाराम राठोड, नारायण उपाध्याय, रवींद्र शार्दूल, गुणाजी गांगड आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. कोरोनाने धास्तावलेल्या ५०० पेक्षा जास्त कुटुंबाना किराणा व भाजीपाला वाटप करण्याचा छावाने पुढाकार घेेेतला होता त्याबरोबरच कोरोना काळात जीवाची पर्वा न करता गोकुळ धोंगडे यांनी वैद्यकीय क्षेत्रात अनेकांना उपचार मिळवून दिले. अनेक अपुऱ्या रस्तांचे निवेदन देऊन कामे मार्गी लावली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी त्यांनी योगदान दिले आहे. यासह तालुक्यातील बस सेवा सुरळीत करण्यासाठी पाठपुरावा केला. सर्वच समाजातील अनाठायी खर्चाबाबत जनजागृती सुद्धा केली. अशा अनेक कामांची दखल घेऊन प्रहार सैनिक कल्याण संघाने त्यांना पुरस्कार दिल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. माजी सैनिकांच्या हातून पुरस्कार मिळाला याचे समाधान गोकुळ धोंगडे यांनी व्यक्त केले.